![]() |
दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचचे सुमारास कामानिमित्त कळंब येथे जाताना तुपसमुद्रे यांनी त्यांची मोटरसायकल बार्शीच्या बस स्थानकातील पार्किंगमध्ये हँडल लॉक करुन लावली होती. दुसऱ्या दिवशी दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी तीनचे सुमारास कळंब येथून परत आल्यानंतर पार्किंगमध्ये लावलेली मोटरसायकल दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्यामुळे त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.
