दारु परवाना विचारल्यामुळे दमदाटी करुन गल्ल्यातील हजार रुपये काढून घेतले

Admin
0

 

Due to asking for liquor license, he took out thousand rupees from cash drawer

Due to asking for liquor license, he took out thousand rupees from cash drawer

बार्शी विशेष : परमिट रुममध्ये दारु पिण्यासाठी आलेल्या ग्राहकांला दारु पिण्याचा परवाना आहे का विचारल्याचा राग आल्यामुळे  कामगारास शिवीगाळी करुन गल्ल्यातील हजार रुपये काढून घेतल्याची घटना वैराग येथे घडली.

वैराग येथील एका परमिट रुममध्ये दारु पिण्यासाठी आलेल्या ग्राहकाला, मॅनेजर कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे काऊंटर सांभाळण्यासाठी बसलेल्या कामगाराने दारु पिण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केल्याचा राग आल्याने त्याने शर्टची गच्ची पकडून शिवीगाळी व दमदाटी सुरू केली. 

त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी मालक तेथे आले असता, त्यांना चापट मारुन शिवीगाळी करत गल्ल्यातील एक हजार रुपये काढून घेऊन तो निघून गेला. अशी फिर्याद परमिट रुममधील कामगार संभाजी शिवाजी कोल्हे (वय २९) रा. वैराग यांनी बबलू यमगर, रा. वैराग यांच्याविरुध्द वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)