![]() |
बार्शी विशेष : रात्री सर्व कुटुंब झोपलेले असताना एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली. तिला फूस लाऊन पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी शहर पोलिसात दिली आहे.
सातवी पर्यंत शिक्षण झालेली ही मुलगी मागील चार वर्षापासून कुटुंबसोबत घरीच असते. नेहमीप्रमाणे ती तिच्या लहान बहिणीसोबत आजोबा जवळ रात्री झोपली होती. तिची आई रात्री तीनचे सुमाराला बाथरुमसाठी उठली तेव्हा ही मोठी मुलगी दिसली नाही. तेव्हा तिने मुलीच्या वडिलांना व आजोबांना उठवून मुलगी घरात नसल्याचे सांगितले.
हे वाचा : आजीकडे जाऊन येते सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता
त्यानंतर सर्वत्र शोध घेऊन व नातेवाईकांकडे चौकशी करुनही तीचा शोध न लागल्यामुळे तिच्या पालकांनी कोणीतरी अज्ञात व्यक्तिने तिला फूस लाऊन पळवून नेल्याचा संशय व्यक्त करुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १५ ते १६ डिसेंबरच्या रात्री घडली.
मागील काही दिवसात बार्शी शहरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झालेल्या असतानाचा, अजून एक तिसरी मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबद्दल पालक धास्तावले आहेत.
