![]() |
बार्शी विशेष : बार्शी शहरातून अजून एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली. महेदमियाँ सिराज लांडगे (वय 46) रा. खॉजानगर, गाडेगांव रोड, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे.
कसबा पेठेतील दस्तगीर दर्ग्यासमोर असलेल्या ठिकाणी ट्यूशनला जाण्यासाठी दि. 14 डिसेंबर रोजी महेदमियाँ लांडगे यांच्या मुलाने त्यांची मोटरसायकल नेली होती. दुपारी तीनचे सुमारास हँडललॉक लाऊन रस्त्याच्या कडेला मोटरसायकल उभी करुन तो ट्यूशनला गेला. आणि सायंकाळी सहाचे सुमारास ट्यूशन संपल्यानंतर तो मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आला असता, त्याला तेथे ती दिसून आली नाही. सगळीकडे शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे महेदमियाँ लांडगे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बार्शी शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असूनही अद्याप त्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे कधी तपास लागणार हाच प्रश्न नागरिकांच्या मनात आहे.
