बार्शीत दुचाकी चोरीचे सत्र सुरुच; घरासमोर लावलेली दुचाकी रात्रीतून गेली चोरीला

Admin
0

 

Bike theft session continues; The bike parked in front of the house was stolen in the night

Bike theft session continues; The bike parked in front of the house was stolen in the night

बार्शी विशेष :  घरासमोर लावलेली दुचाकी रात्रीतून चोरीस गेल्याची घटना घडली. प्रसाद शाम डोंगरे (वय २४) रा. पंकजनगर, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे.

दि. १३ डिसेंबर रोजी रात्री नऊचे सुमारास कामावरुन घरी आल्यानंतर प्रसाद डोंगरे यांनी त्यांची मोटरसायकल हँडललॉक करुन घरासमोर लावली. आणि जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपी गेले.

दि. १४ डिसेंबरच्या पहाटे अडीचचे सुमारास त्यांचे वडिल लघुशंकेसाठी घराबाहेर गेले असता त्यांना घराबाहेर लावलेली मोटरसायकल तेथे दिसून आली नाही. ही गोष्ट त्यांनी प्रसादला झोपेतून उठवून सांगितली. त्यानंतर प्रसाद यांनी त्यांच्या मित्रासह सर्वत्र शोध घेतला. तरीही ती न सापडल्यामुळे ती चोरीस गेल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली.

पोलिसांपुढे आव्हान

चोरांनी सध्या बार्शी शहरात दुचाकी चोरीचा सपाटा लाऊन पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)