आजीकडे जाऊन येते सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता; शहर पोलिसात तक्रार दाखल

Admin
0

 

Another recent incident in Barshi is the disappearance of a minor girl who went to her grandmother
A minor girl who went to her grandmother's house is missing

बार्शी विशेष : आजीकडे जाऊन येते सांगून गेलेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. तिला पळवून नेल्याच्या संशयावरुन तिच्या पालकांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.

अकरावीच्या वर्गात बाहेरगांवी शिक्षण घेत असलेली ही मुलगी दहा दिवसांपूर्वी घरी आली होती. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सहाचे सुमारास शहरातील आजीकडे जाऊन येते असे सांगून ती स्कूटी घेऊन गेली. 

त्यानंतर ती घरी परत न आल्यामुळे पालकांनी तिच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या पालकांनी आजी, नातेवाईक तसेच तिच्या मैत्रिणीकडे विचारपूस करुन सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणांसाठी तिला फूस लाऊन पळवून नेल्याचा संशय व्यक्त करुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अलीकडच्या काळातील बार्शीतील दुसरी घटना

मागील काही दिवसांपूर्वीच एक मुलगी औषध आणण्यासाठी म्हणून गेली, ती ही बेपत्ता झाल्यामुळे तिला पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल झालेली असतानाच, आणखी ही एक घटना घडल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)