![]() |
विक्रम कदम हे त्यांचा लहान भाऊ शेषेराव कदम यांच्यासह शेतातील पाईपलाईनसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी दि. २६ डिसेंबर रोजी बार्शीत आले होते. भावाने साहित्य खरेदी केल्यावर, विक्रम कदम यांचेकडे रोख रक्कम नसल्याने दुपारी साडेचारचे सुमारास बसस्थानकासमोर असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मशीमधून पैसे काढण्यासाठी ते गेले.
एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा दोनवेळा प्रयत्न करुनही पैसे त्यांना निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या मागे असणाऱ्या अंदाजे ३५ वर्षाच्या इसमाने मी पैसे काढून देतो असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्याने सांगितल्या प्रमाणे कार्ड मशिनमध्ये टाकले आणि त्याने पिन कोड टाकायला लावला. नंतर काका तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे पैसे निघत नाही असे म्हणून कार्ड त्यांच्या हातात देवून तो निघून गेला.
एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे का याची खात्री करण्यासाठी कदम यांनी बँकेत जावून मॅनेजरकडे कार्ड पाहाण्यासाठी दिले, त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर १० हजार रुपये दोन वेळेस, १०,२०० एक वेळेस आणि ५,१०० रुपये दोन वेळेस असे एकूण ४० हजार ४०० रुपये काढल्याचे मेसेज आले.
तुमचे पैसै कुठे जाणार नाहीत, त्याची चौकशी केली जाईल, तुम्ही पोलिस ठाण्यात तक्रार द्या असे बँक मॅनेजर यांनी सांगितल्या नुसार कदम यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
