श्री भगवंत रथोत्सवात स्वच्छता मोहीम; जय भगवंत ढोल-ताशा, ध्वज पथकाचा उपक्रम

Admin
0

  

https://www.barshivishesh.in
Sanitation campaign carried out at Shri Bhagwant Rathotsava

बार्शी विशेष : आषाढी एकादशी निमित्त रविवार दि. १० जुलै रोजी श्री भगवंताची रथयात्रा बार्शी शहरातून काढण्यात आली. मागील दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या संकटामुळे रथोत्सवामध्ये खंड पडला होता. त्यामुळे यंदा रथोत्सवात भाविकांचा मोठा उत्साह पहावयास मिळाला.

या सोहळ्यात शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती व भाविक आपल्या परीने अनेक उपक्रम राबवित असतात. बार्शीच्या जय भगवंत ढोल-ताशा, ध्वज पथकाने मात्र रथोत्सवासोबत स्वच्छता मोहीम राबवून वेगळेपण जपले आहे. यामुळे स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे, हा नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करुन, अनेक सामाजिक संघटनांना वेगळा विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. 

https://www.barshivishesh.in

पथक प्रमुख हर्षद लोहार, प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय कदम, आप्पा घबाडे, सुदर्शन मोरे, राम परदेशी, गणेश ढगे, संतोष चव्हाण, बरिदे, अक्षय काजळे, अमित मिसाळ, शुभम यंदे, जगदिश रणदिवे, रणदिवे, रोहित कडवे, प्रेम दोरगे, अतिश पालके, अभिषेक वळेकर, ओंकार झालटे, विश्वजित गोसावी, सतिश डुकरे, समाधान सुर्वे, सुरज साळवे, माऊली रामगुडे, दत्ता रामगुडे, दिनेश यादव, मनोज कटके, ओम टेकाळे, खानेश मुळे, अबोली पालके, साक्षी लाकाळ, देवकी जगताप, वैष्णवी जगताप, श्वेता पाटिल, प्रतिक्षा पाटिल, किरण बोकेफोडे, ऋतुजा यादव, स्मिता कदम, ऋतुजा लाटणे यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. 

https://www.barshivishesh.in
बार्शी नगरपरिषदेकडून या उपक्रमाला वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी माजी आरोग्य सभापती संदेश काकडे यांनी विशेष सहकार्य केले.

या उपक्रमाची दखल घेऊन पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी कौतुकाची थाप टाकली तर, श्री भगवंत देवस्थान ट्रस्टच्या वतीने पथकाला सन्मानीत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सरपंच दादासाहेब बुडूख, नाना सुरवसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार आदी उपस्थित होते.

या संघटनेने आतापर्यंत स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, किल्ले शिवनेरी येथे स्वच्छता मोहिम, श्री भगवंत मंदिर स्वच्छता मोहिम, शिवजयंती पालखी सोहळा व भगवंत महोत्सवात ढोल वादन आदी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वृक्ष संवर्धन समितीकडूनही त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)