'मेघदूत' पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
'Meghdoot' award ceremony held

कविता समाज जीवनाला आकार देते : डॉ.राजेंद्र दास

बार्शी विशेष : ज्याला दुसऱ्याचे मन समजते त्याच्याच मनात कविता तयार होते. चांगला कवी असणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच चांगला माणूस असणं महत्वाचं आहे. कविता ही गांभीर्याने जगण्यावर भाष्य करत असते. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ राजेंद्र दास यांनी केले.

कवी कालिदास मंडळाच्या वतीने कालिदास महोत्सवानिमित्त कवीच्या पहिल्या संग्रहास देण्यात येणाऱ्या मेघदूत पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले माणसाच्या मनात घर करणारी खरी कविता असते. ज्यात सत्व असतं तेच टिकतं माणूसपण जपणारी कविता समाज जीवनाला आकार देते. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांनी कालिदास मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करत कवी कालिदासाच्या साहित्यातील अनेक घटना विषद करत मानवी जीवनात साहित्याचे महत्वाचे स्थान असल्याचे सांगितले. मेघदूत पुरस्कार विजेते कवयित्री भाग्यश्री केसकर व कवी प्रकाश लावंड यांनीही मनोगतात आपल्या काव्य प्रवासामागील प्रेरणा सांगितल्या. दत्ता गोसावी, प्रमिलाताई देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. 

मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील अर्चना देशपांडे-पोळ (प्रथम), युवराज जगताप (द्वितीय), नरसिंहेश्वर शिंदे (तृतीय) कैवल्य गायकवाड,गौरी स्वामी,पल्लवी पाटील (उत्तेजनार्थ) या विजेत्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी वैष्णवी घावटे हिने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी, सूत्रसंचालन अर्चना देशपांडे-पोळ यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश गव्हाणे यांनी केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आबासाहेब घावटे, शब्बीर मुलाणी, मुकुंराज कुलकर्णी, डॉ रविराज फुरडे, सुमन चंद्रशेखर यांनी परिश्रम घेतले. यावेळी अतुल सोनिग्रा, मुरलीधर चव्हाण, अमित इंगोले, शशिकांत धोत्रे, सुनील विभूते, रमाकांत लिंबकर आदींसह अनेक साहित्यरसिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)