![]() |
| Breaking the lock of a locked house at Raleras and stealing gold jewelery |
बार्शी : बांधकाम चालू असलेल्या नविन घरात पाण्याची सोय नसल्याने, सद्या शेजाऱ्याच्या घरात राहण्यास असलेले नवनाथ गुणवंत भोसले (वय ४३), रा. राळेरास, ता. बार्शी यांनी नविन घरात त्यांचे सर्व सामान नेऊन ठेवलेले होते.
दि. ४ जून रोजी नविन घरास कुलूप लाऊन ते शेजारील प्रकाश भोसले यांच्या घरी झोपण्यास गेले, व दि. ५ जून रोजी सकाळी सहाचे सुमारास घरी आले असता, त्यांना घराला बाहेरुन लावलेले कुलूप तोडून खाली टाकल्याचे व घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले.
घरात जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचे व आतील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. कपाटाची पाहणी केली असता त्यामधील १ तोळे सोन्याचे मंगळसूत्र व सुट्टे मणी, ५ ग्रॅम सोन्याचे झुबे फुले असे एकूण अं. किंमत ६७ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबतची फिर्याद नवनाथ भोसले यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली असून, त्यानुसार अनोळखी व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
