बार्शीच्या बस स्थानकातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार आरोपींना अटक

Admin
0

 

https://www.barshivishesh.in
Four accused of stealing gold jewelery from Barshi bus stand arrested

बार्शी : बार्शी बस स्थानकावरुन प्रवाश्यांच्या पर्समधील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार आरोपींना अटक केल्याची माहिती बार्शी शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी दिली.

दि. २६ मे २०२२ रोजी पुणे येथील दीपक रामदास एडके  हे पत्नी व मुलाबाळांसह बार्शी ते उस्मानाबाद बसने प्रवास करत असताना, त्यांच्या पत्नीच्या पर्समधून दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते.

यासंदर्भात तपास करत असताना, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, भूम येथील अमोल विक्रम धोत्रे व सुमित प्रमोद गवळी यांनी ही चोरी केल्याची समजल्याने त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता, त्यांनी बार्शी येथील विशाल दगडू मांगडे व अशोक पांडुरंग कांबळे (दोघेही रा. मांगडे चाळ, बार्शी) यांनी आम्हाला बार्शी येथे बोलावून बार्शी बस स्थानकावरुन जाणऱ्या येणाऱ्या प्रवाश्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने काढण्यास सांगितल्याने आम्ही दि. २६ मे रोजी वरील इसमाच्या पर्समधील सोन्याचे दागिने काढून त्यांच्याकडे दिल्याची कबूली दिली.

त्यानुसार पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. ९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस करत असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)