चाकूचा धाक दाखवून तिघांनी मोटरसायकस्वाराला लुटले

Admin
0

https://www.barshivishesh.in
Fearing a knife, the three robbed the motorcyclist


बार्शी : सुहास नागनाथ मंडलीक (वय ३०), रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर, हे दि. ६ जून रोजी पत्नी व मुलासह मोटरसायकलवरुन लासूणा, ता. जि. उस्मानाबाद येथील एका लग्नास गेले होते.

तेथून परत येत असताना गौडगांवच्या नागोबा चौकातील पेट्रोल पंपावर सायंकाळी सातचे सुमारास पेट्रोल भरुन ते गांवाकडे जाण्यासाठी निघाले. वैरागकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना साधारण एक किमी अंतर पुढे वैरागकडे आल्यानंतर पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरुन आलेल्या व तोंडाला रुमाल बांधलेल्या तिघांनी त्यांना थांबायला सांगितले.

त्यावेळी त्यांच्या मोटरसायकलचा वेग कमी होताच तिघापैकी एकाने त्यांच्या गाडीची चावी काढून घेऊन त्यांना खाली उतरविले. आणि चाकूचा धाक दाखवून मंडलीक यांच्या खिशातील मोबाईल, पत्नीच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे गंठण, ३ ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि नाकातील १ ग्रॅम सोन्याची नथ काढून घेऊन त्या तिघांनी उस्मानाबादच्या दिशेने पोबारा केला.

या घटनेची फिर्याद मंडलीक यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली असून, त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)