An important decision of the government regarding roads in rural areas
बार्शी विशेष : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार बार्शी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत दि. १७ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गाव नकाशावरील नोंद असलेले व नोंद नसलेल्या रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करणे, सिमांकन करणे व त्यावर असलेले अतिक्रमण हटविणे आणि सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे आदी कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
ग्रामीण भागातील ग्रामिण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबाबतची कार्यवाही करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, कोतवाल व ग्राम पातळीवरील विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची ग्राम स्तरावर ग्रामीण रस्त्यांबाबतची पुढीलप्रमाणे ग्राम रस्ता आराखडा समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये मंडळ अधिकारी, महसूल (अध्यक्ष), ग्राम पंचायत अधिकारी (सदस्य), कृषि सहाय्यक (सदस्य), पोलीस पाटील (सदस्य), कोतवाल (सदस्य), सरपंच (निमंत्रित सदस्य), उपसरपंच (निमंत्रित सदस्य) त्या गावाचे जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य (निमंत्रित सदस्य), ग्राम महसूल अधिकारी (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे.
या समितीच्या माध्यमातून,
१) ग्रामस्तरावरील प्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पाथमार्ग, गाडीमार्ग, शेत/पाणंद रस्त्यांचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे आणि सदर रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देणे या कार्यक्रमाला व्यापक प्रसिध्दी देवून गावामध्ये शिवार फेरी आयोजित करणे,
२) समितीने गाव नकाशावर नोंद असलेल्या व नोंद नसलेल्या रस्त्यांची प्रपत्र १ व प्रपत्र २ मध्ये नोंद करुन यादी बनविणे व अभिलेख अद्ययावत करणे,
३) गावनिहाय तयार करणेत आलेली प्रपत्र १ व प्रपत्र २ मधील रस्त्यांची यादी ग्रामसभेच्या मान्यतेसाठी ठेवणे,
४) ग्रामसभेच्या मान्यते नंतर अंतिम झालेली यादी प्रामसभेच्या ठरावासह तहसिलदार कार्यालयात सादर करणे,
५) तयार करण्यात आलेल्या यादीप्रमाणे उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयाकडुन सिमांकन करणेसाठी यादी पाठविणे व त्यांना सहकार्य करणे.
६) वरीलप्रमाणे प्रपत्र १ व २ मधील रस्त्यांच्या नोंदी गाव नमुना १ फ मध्ये घेणे, त्यानंतर मंजूर रस्त्यांना संकितांक क्रमांक देणे,
७) प्रत्येक गावांमध्ये रस्ता अदालत आयोजित करुन अतिक्रमित शेतरस्त्यांचे प्रलंवित प्रकरणे निकाली काढणे.
८) ज्या रस्त्यावर अतिक्रमण आहे अशा रस्त्यांचे गाव नकाशावर नोंद घेवून शेतकऱ्यांच्या बैठका घेवून त्यांना समजावून अतिक्रमण काढून टाकणे.
९) ग्रामपंचायतीकडून शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणेकरिता प्रस्ताव तयार करणे. वरीलप्रमाणे सर्व संबंधितांनी वेळोवेळी प्राप्त सुचनांनुसार रस्त्याबाबत प्रपत्र १ प प्रपत्र २, गाव नमुना फ तसेच रस्ता सांकेतांक तयार करणे.
अशारीतीने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे बार्शीचे तहसिलदार एफ. आर. शेख यांनी सांगतिले.