श्री भगवंत प्रगट दिनानिमित्त नविन भक्तीरचनेचे अनावरण

0

New devotional creation publication
श्री भगवंत, बार्शी

बार्शी विशेष : श्री भगवंत प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला भगवंत भक्त विजय थोरात (कोरे) रचित "माझ्या हृदयात वसतो भगवंत, माझ्या प्रत्येक श्वासात भगवंत" या नविन भजनाचे अनावरण करण्यात येणार आहे. 

गुरुवर्य ह.भ.प. डॉ  जयवंत बोधले महाराज आणि मा. आमदार राजाभाऊ राऊत यांचे  शुभ हस्ते, बार्शीच्या  नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार एफ. आर. शेख, शहर पो.नि. बालाजी कुकडे, अमृत नाना राऊत (माऊली उद्योग समूह), पत्रकार सचिन वायकुळे, डिजिटल मीडिया पत्रकार संघ  असोसिएशन, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सोलापूर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रोजेक्टरच्या माध्यमातून या भगवंत भजनाचे  अनावरण केले जाणार आहे.


२७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता श्री भगवंत मंदिरात हा कार्यक्रम होणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री भगवंत मंदिर समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)