| Minor student studying in Barshi goes missing, Police investigation underway (AI Image) |
बार्शी विशेष : शहरातील एका महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली. कुणीतरी तीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करुन पालकांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार बेपत्ता झालेली मुलगी महाविद्यालयात जाण्यासाठी नेहमी सकाळी दहाचे सुमारास घरातून बाहेर पडते आणि दुपारी दोनपर्यंत घरी येते. परंतु २८ मार्च रोजी तीन वाजून गेले तरी घरी आली नाही. त्यामुळे पालकांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली, आजूबाजूचे परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला तरीही ती मिळून आली नाही.
पालकांच्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भा. न्या. सं. १३७ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, उपनिरिक्षक प्रदीप झालटे अधिक तपास करत आहेत.
