![]() |
| गॅस दरवाढ आणि टी-२० विश्वचषक अंतिम सामना | रविवार, ८ मार्च २०२६. |
बार्शी विशेष : आजच्या ठळक घडामोडी | रविवार दि. ८ मार्च २०२६ (Breaking News)
◥ एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ: इराण-इस्रायल युद्धाच्या जागतिक परिणामी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरमध्ये ११५ रुपयांची दरवाढ झाली आहे.
◥ टी-२० विश्वचषक अंतिम लढत: आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. इंग्लंडला पराभूत करून भारताने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
◥ रंगपंचमी निमित्त १०० बैलगाड्यांची मिरवणूक: सोलापुरातील लोधी गल्लीतून लोधी समाजातर्फे १५० वर्षांची परंपरा जपत आज १०० बैलगाड्यांतून रंगांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
◥ रेल्वेची 'डिवाईन राजस्थान' सहल: आयआरसीटीसी तर्फे २७ मार्चला सोलापूरहून राजस्थान आणि उज्जैन दर्शनासाठी विशेष पर्यटन रेल्वे रवाना होईल.
◥ सोलापूरचा पारा ४० अंशांकडे: शहरात काल ३९.६ अंश तापमानाची नोंद झाली असून, पुढील दोन दिवसांत पारा ४० अंशांच्या पार जाण्याची शक्यता आहे.
◥ बार कौन्सिल निवडणूक: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून ७ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
◥ स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण: केगाव येथील एमआयटी (MIT) विश्वप्रयाग विद्यापीठात स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते.
◥ आदर्श अंगणवाडी कर्मचारी पुरस्कार: महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील ११२ अंगणवाडी कर्मचारी आणि पर्यवेक्षिकांचा विशेष गौरव करण्यात आला.
◥ दोन पोलिसांचे निलंबन: पंढरपूर येथे कंटेनर चालकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई.
◥ महाराष्ट्र केसरी निवड: सोलापूरच्या रवीराज चव्हाण आणि जय पाटील यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
◥ नाट्यगृहासाठी जागा उपलब्ध: आरटीओ कार्यालयाजवळ नाट्यगृहासाठी दीड एकर जागा मिळाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
स्त्रोत : सोलापूर आकाशवाणी
