रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले वाहतूक नियमन

Admin
0

 

Road Safety Drive: College students take charge of traffic management
(AI-generated image)

Road Safety Drive: College students take charge of traffic management


बार्शी विशेष : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियम मार्गदर्शन शिबीराचे आयोजन बार्शी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आले होते.

यामध्ये अकरावी व बारावीतील २४ विद्यार्थी व विद्यार्थीनींना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन करुन कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी रहादारीचे बस स्टँड चौक, पोस्ट चौक, पांडे चौक, भोसले चौक याठिकाणी दुपारी १२ ते २ दरम्यान वाहतूक पोलिसांसोबत नियमनाचे काम करण्याची संधी देण्यात आली.

वाहतूक नियमांची माहिती व प्रत्यक्ष नियमनाची संधी मिळाल्यामुळे हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

सदर शिबीर अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पो.अधिक्षक प्रीतम यावलकर, उविपो अधिकारी अशोक सायकर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि बालाजी कुकडे, उपनिरिक्षक महेश गळगटे, प्राचार्य ए.बी. शेख, प्रा. युवराज खुळे, प्रा. शिल्पा वाघ तसेच वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी यांनी यशस्वी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)