बार्शी परिसरातून हरवलेले ४८ मोबाईल नागरिकांच्या स्वाधीन

Admin
0

 

48 mobile phones lost from the Barshi area were handed over to citizens

48 mobile phones lost from the Barshi area were handed over to citizens


बार्शी विशेष : बार्शी शहर परिसरातून हरविलेले सुमारे साडेनऊ लाख रुपये किंमतीचे ४८ मोबाईल हँडसेट उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर व बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे  यांच्या उपस्थितीत तक्रारदार नागरिकांना परत करण्यात आले.

बार्शी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, भाजी मंडई, बाजारपेठ परिसरातून गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी शहर पोलिसांनी मोहिम राबविली. 

या मोहिमेतंर्गत दूरसंचार विभागाने सुरु केलेल्या सीईआयआर पोर्टलच्या सहाय्याने लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर तसेच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश अशा विविध ठिकाणाहून जानेवारी २०२५ पासून आत्तापर्यंत २१ लाख ३० हजार रुपये किंमतीचे एकूण १०९ मोबाईल हस्तगत केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ही कामगिरी उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोकॉ संतोष जाधव, सचिन देशमुख, रतन जाधव आदींनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)