वृध्द नागरिकाची दुचाकी बार्शी पोलिसांकडून घरपोच परत

Admin
0

 

An elderly citizen was given a two-wheeler ride home by the Barshi police

An elderly citizen was given a two-wheeler ride home by the Barshi police


बार्शी विशेष : पोलिस ठाण्यात जमा असलेल्या दुचाकी वाहन मुद्देमाल निर्गती कार्यवाहीत, वयपरत्वे दुचाकी घेऊन जाण्यासाठी पोलिस ठाण्यात येऊ शकत नसल्याचे एका वयोवृध्द नागरिकाने कळविल्यामुळे बार्शी शहर पोलिसांनी त्यांना दुचाकी घरपोच परत दिली.

बार्शी शहर पोलिस ठाण्यात जमा असलेल्या दुचाकी वाहन मालकांना परत देण्याची कार्यवाही सध्या सुरु आहे. परंतु बार्शीच्या कसबा पेठेतील रहिवासी जगन्नाथ बापूराव सरवदे (वय ७५) यांनी वयपरत्वे दुचाकी परत नेण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्यास असमर्थता दर्शविली.

त्यांची समस्या लक्षात घेऊन बार्शी शहर पोलीस निरिक्षक बालाजी कुकडे यांनी, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अंमलदार सचिन कदम, प्रवीण शहाणे, शरद साळवे यांचेमार्फत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन, त्यांना दुचाकी घरपोच परत दिली. पोलिस ठाण्यात न जाता दुचाकी घरपोच परत मिळाल्यामुळे जगन्नाथ सरवदे यांनी समाधान व्यक्त करुन पोलिसांचे आभार मानले.

एका जेष्ठ नागरिकाच्या अडचणीसंदर्भात शहर पोलिसांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)