११ अर्जाच्या माघारीमुळे २० उमेदवार बार्शी विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

Admin
0

With withdrawal of 11 nominations, 20 candidates in fray for Barshi Assembly polls
 

With withdrawal of 11 nominations, 20 candidates in fray for Barshi Assembly polls

बार्शी विशेष : बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याच्या ४ नोव्हेंबर या आजच्या अंतिम दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत ११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

या निवडणूकीसाठी एकूण ३७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये ईस्माईल मुसा पठाण, शोएब साबीर सय्यद, गुरुदास संभाजी कांबळे, धीरज जयचंद साबळे, बाबासाहेब भागवत गायकवाड व रविशंकर भगवंत गोदणे या सहा उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले होते. 

तर आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीअखेर भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर, नंदकुमार नारायण जगदाळे, परमेश्वर भागवत पासले, युवराज भाऊसाहेब काटे, आनंद रामचंद्र काशिद, विजय बाळकृष्ण साळुंके, दिलीप दामू साठे, प्रमोद प्रविणकुमार घोडके, रामेश्वर किसन कुलकर्णी, अनिल बबन गवसाने व गुलमहंमद अद्बुल लतीफ आतार या ११ जणांनी आपले अर्ज माघारी घेतले.

त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघातून आता २० उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  निवडणूकीच्या रिंगणातील २० उमेदवार याप्रमाणे,

 १) आनंद नागनाथ यादव 
 २) मधुकार बाबूराव काळे 
 ३) दिलीप गंगाधर सोपल 
 ४) मनोज महादेव कांबळे 
 ५) आकाश पांडुरंग दळवी 
 ६) राजेंद्र विठ्ठल राऊत 
 ७) किशोर परमेश्वर गाडेकर
 ८) मोहसिन साबीर तांबोळी 
९) धनंजय आनंदराव जगदाळे 
१०) साहेबराव शहाजीराव देशमुख
११) विनोद विक्रम जाधव 
१२) लालू दस्तगीर सौदागर 
१३) अब्बास अहमद शेख 
१४) ईस्माईल उस्मान पटेल 
१५) शरीफ रशीद शेख 
१६) समीर मुबीन सय्यद 
१७) किरण लक्ष्मण मांजरे
१८) मोहसीन बाबू पठाण 
१९) किशोर आनंद देशमुख 
२०) वर्षा विनोद कांबळे 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)