बार्शी बसस्थानकातून पर्स चोरणारी संशयित महिला पोलिसांच्या ताब्यात

Admin
0

Suspected Woman who steals purse from Barshi bus Stand in police custody 

Suspected Woman who steals purse from Barshi bus Stand in police custody

बार्शी विशेष : बार्शी बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. याबाबत फिर्याद दाखल होताच बार्शी शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित महिलेला बार्शी बसस्थानकातून ताब्यात घेतले. ही घटना ३०ऑक्टोबर रोजी दुपारी २ चे सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजीवनी पंडित वाघमारे (वय ५५) रा. कवठाळी, ता. उत्तर सोलापूर या पतीसह बहिणीकडे जाण्यासाठी बार्शी बसस्थानकातून परांडाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढल्या. त्यावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याजवळ असलेल्या मोठ्या पर्समध्ये ठेवलेली सोन्याचे १२ ग्रॅम वजनाचे गंठण, आधार व पॅन कार्ड आणि सातशे रुपये ठेवलेली लाल रंगाची लहान पर्स लंपास केली.

तिकीट काढण्यासाठी मोठी पर्स उघडली तेव्हा लहान पर्सची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने चोरी करण्याच्या उद्देशाने बसस्थानकात फिरत असलेल्या संशयित महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यावेळी संशयित महिलेने चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

काही दिवसांपूर्वीही बार्शी बसस्थानकात चोरी करणाऱ्या बीड येथील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. बार्शी बसस्थानकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी चोऱ्या होण्याआधीच अधिक लक्ष दिल्यास, फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाणे गाठण्याची गरज पडणार नाही अशी प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)