टपाली मतदानाला सुरूवात तर जेष्ठ मतदारांसाठी उद्यापासून गृह मतदान

Admin
0

 

Postal voting started, while home voting for senior voters begins tomorrow

Postal voting started, while home voting for senior voters begins tomorrow


बार्शी विशेष : निवडणूक कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान आज (१३ नोव्हेंबर) पासून बार्शी तहसील कार्यालयात सुरु झाले. उद्या १४ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ पासून ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मतदारांचे मतदान घेण्यासाठी एकूण १९ पथके गृह भेटीसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.

टपाली मतदान (३३२३), बार्शी विधानसभा मतदारसंघ (९८४), इतर विधानसभा मतदारसंघ (१७६९), गृह मतदान (५७०),  (ETPBS) इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम (५६३) याप्रमाणे एकूण ३८८६ इतके हे मतदान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)