536 elderly and disabled persons cast their votes at home
बार्शी विशेष : बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जेष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची प्रक्रिया १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान निवडणूक शाखेकडून राबविण्यात येत असून गृहभेटीसाठी १९ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. २४६ बार्शी विधानसभा मतदार संघात ८५ पेक्षा अधिक वय असलेले ५३० आणि ४० दिव्यांग असे ५७० मतदार आहेत.
पथकांनी दिलेल्या गृह भेटीदरम्यान ५७० पैकी ५३६ मतदारांनी १४ व १५ नोव्हेंबर या दोन दिवसात आपला मतदानाचा हक्क बजावला. २० मतदार गृह भेटीवेळी अनुपस्थित होते, तर ३ मतदारांनी मतदान करण्यास नकार दिला तसेच ११ मतदार मयत आहेत अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली. अनुपस्थित मतदारांचे मतदान करुन घेण्यासाठी नियुक्त पथके १६ नोव्हेंबर रोजी पुन्हा गृहभेट देणार असल्याचेही ते म्हणाले.
मतदानासाठीच्या गृह भेटीदरम्यान वैराग येथील सोनाबाई भगवान जाधव या १०९ वयाच्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला.