Barshi Assembly Elections 2024: Nominations of 6 candidates disqualified
बार्शी विशेष : विधानसभा निवडणूकीसाठी २९ ऑक्टोबर या अंतिम मुदतीअखेर ३७ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज पार पडली. त्यामध्ये ईस्माईल मुसा पठाण, शोएब साबीर सय्यद, गुरुदास संभाजी कांबळे, धीरज जयचंद साबळे, बाबासाहेब भागवत गायकवाड व रविशंकर भगवंत गोदणे या सहा उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले.
त्यामुळे आता जरी ३१ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असले तरी अर्ज माघारी घेण्याच्या ४ नोव्हेंबर या अंतीम मुदती नंतरच बार्शी विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार असतील याचे चित्र स्पष्ट होईल.