Motorcycle stolen from in front of Savale Auditorium
बार्शी विशेष : शहरातील सावळे सभागृहासमोर असलेल्या घराबाहेर लावलेली मोटरसायकल रात्रीतून चोरीला गेली. ही घटना १४ सप्टेंबरच्या रात्री ८ ते १५ सप्टेंबरच्या सकाळी ७ चे दरम्यान घडली.
घराबाहेर काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो मोटरसायकल क्र. एमएच-१३-झेड-४७२० रात्री नेहमीप्रमाणे लावून जेवण करुन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घराबाहेर येऊन पाहिले, त्यावेळी तेथे लावलेली मोटरसायकल चोरीला गेल्याचे दिसून आले असे प्रविण शंकर जाधव (वय ४४) रा. सावळे सभागृहासमोर, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.