खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे दूध विक्रेत्यास मारहाण

Admin
0

 

Milk vendor beaten up for refusing to pay the ransom

Milk vendor beaten up for refusing to pay the ransom

बार्शी विशेष : दुधाचा धंदा करायचा असेल तर दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, या मागणीस नकार दिल्यामुळे दोघांनी दूध विक्रेत्यास मारहाण करुन खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. बार्शीच्या तेलगिरणी चौकात ही घटना घडली. याबाबत अक्षय नवनाथ साळुंखे (वय २८) रा. भीमनगर, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

रात्री साडेबाराच्या सुमारास मी तेलगिरणी चौक येथे गेलो, त्यावेळी विशाल रणदिवे व वैभव काकडे यांनी मला या भागात दुधाचा धंदा करायचा असेल तर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली. त्या मागणीस नकार देताच दोघांनी मारहाण करुन माझ्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे अक्षय साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बार्शी शहर पोलिसात विशाल रणदिवे (वय २६) रा. टिळक चौक, बार्शी व वैभव कैलास काकडे (वय २८) रा. अण्णाभाऊ साठे नगर, सुलाखे हायस्कूल रोड, बार्शी यांचेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)