खरिप दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी त्वरित कागदपत्रे द्या

Admin
0

 

Provide documents immediately to get kharip subsidy

Provide documents immediately to get kharip subsidy


बार्शी विशेष : खरिप दुष्काळ २०२३ मध्ये बार्शी तालुक्याचा समावेश करून शासनाने निविष्टा अनुदान उपलब्ध करून दिलेले असून, सदरचे अनुदान मुदतीत संबंधित खातेदारांना संगणकीय प्रणालीव्दारे थेट शेतक-यांच्या आधार सिडींग असलेल्या बँक खात्यात जमा करणेचे कार्यवाही सुरू आहे. त्याप्रमाणे काही खातेदारांना अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. 


तथापि काही खातेदारांनी खरीप दुष्काळ यादीमध्ये नाव समाविष्ट असतानाही आपले आधारक्रमांक व बँक तपशील तलाठी कार्यालयास जमा केलेला नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही काही खातेदारांकडून सदर कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात नसल्याची बाब समोर आलेली आहे. 


तरी खरिप दुष्काळ २०२३ च्या मूळ यादीत नाव असलेल्या, परंतु आधारक्रमांक, बँकपासबुक इ. माहिती उपलब्ध करून न दिलेल्या खातेदारांनी १५ मे २०२४ पर्यंत आपले आधार कार्ड, बँक पासबुक व सामाईक खाते असल्यास संमतीपत्र संबंधित तलाठी कार्यालयात जमा करावेत, अन्यथा विहीत मुदतीत माहिती न देणा-या खातेदाराचे अनुदान शासनास परत करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी सूचना बार्शीचे तहसिलदार एफ. आर. शेख यांनी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)