लोकसभा निवडणुकीसाठी बार्शी विधानसभा मतदारसंघातून ६५.२९ टक्के मतदान

Admin
0

 

65.29 per cent voter turnout recorded from Barshi Assembly constituency for Lok Sabha polls
65.29 per cent voter turnout recorded from Barshi Assembly constituency for Lok Sabha polls


बार्शी विशेष : धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मंगळवार दि. ७ मे रोजी पार पडलेल्या मतदानात बार्शी विधानसभा मतदार संघातून ६५.२९ टक्के मतदान झाले.

बार्शी विधानसभा मतदारसंघात १ लाख ५४ हजार ७३४ महिला, १ लाख ६६ हजार ४९७ पुरुष आणि ३९ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख २१ हजार २७० मतदार आहेत. त्यापैकी ९७ हजार ५४१ महिला, १ लाख १२ हजार २०२ पुरुष आणि ११ तृतीयपंथी अशा एकूण २ लाख ९ हजार ७५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बार्शीतील तपमानाचा पारा सुमारे ४२ अंशापर्यंत पोहोचला असतानाही बार्शीकरांनी घराबाहेर पडून, मतदान केंद्रावर रांगा लावत जबाबदारीने मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी दाखविलेला उत्साह कौतुकास्पद होता. 



  • सुविधांचा अभाव...

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षणासाठी सावली, पिण्यासाठी थंड पाणी, रांगेतील जेष्ठ मतदारांना त्रास झाल्यास बसण्यासाठी खुर्च्या किंवा बाकांची व्यवस्था, वृध्द नागरिकांसाठी रँप, प्रसाधनगृह, प्राथमिक औषधोपचार संच, ओआरएस पावडर आदी सुविधा असणे गरजेचे होते, परंतु काही केंद्रावर यापैकी काही सुविधा उपलब्ध नव्हत्या असे काही मतदारांचे म्हणणे होते. तसेच सेल्फी पॉईंट नसल्यामुळे बऱ्याच जणांचा हिरमोड झाला.


  • एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच मतदान केंद्रात न आल्यामुळे वेगवेगळ्या केंद्रावर जाऊन मतदान करावे लागले.
  • मतदानासाठी परगांवाहून आलेल्या काही मतदारांची नांवे यादीतून गायब झाल्याचे समजल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली.
  • तृतीयपंथीयांच्या प्रश्नावर काम करणारे सचिन वायकुळे यांच्या प्रयत्नामुळे, यंदा प्रथमच मतदान केलेल्या तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)