![]() | |
Motorcycle stolen from central area of Barshi
बार्शी विशेष : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हॉस्पिटलच्या पार्किंगमधून मोटरसयकल चोरीला गेल्याची घटना घडली. यासंदर्भात किरण जयंत हिंगमिरे (वय ३५) रा. जुनी चाटे गल्ली, बार्शी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
फिर्यादी किरण हिंगमिरे हे जुनी चाटे गल्ली येथील राहिवासी असून, त्यांनी त्यांची काळ्या रंगाची हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल क्र. एमएच-१३-डीबी-३८३० ही रात्री नेहमीप्रमाणे घराशेजारी असलेल्या मोरे हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटरसायकल घेण्यासाठी ते गेले असता, ती लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही, त्यामुळे त्यांनी मित्रांसह मोटरसायकलचा आजूबाजूस व शहर परिसरात शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही.
ही घटना दि. २१ एप्रिल २०२४ रात्री साडेदहा ते २२ एप्रिलच्या सकाळी सातचे दरम्यान घडली असून, अनोळखी इसमाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.