दरोडेखोराची टोळी अटकेत; साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Admin
0

 

Robber gang arrested; Six and a half lakh worth of goods seized

Robber gang arrested; Six and a half lakh worth of goods seized

बार्शी विशेष : काही दिवसांपूर्वी बार्शीतील बंगल्यावर दरोडा टाकून सोने व रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीस शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून साडेसहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी लातूर रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथे राहणारे विनोद सुभाष राऊत यांच्या बंगल्यात ३ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री चार इसमांनी दरोडा टाकून हत्याराने जबर मारहाण करुन २७ ग्रॅम सोन्यासह १२ हजार रुपये रोख रक्कम लुटल्याची घटना घडली होती. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 


सदर गुन्ह्याचा तपास बार्शीची गुन्हे प्रकटीकरण शाखा करत असताना, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे चार आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, १) करतारसिंग आचोलसिंग दुधानी (वय २४) २) जगजितसिंग उर्फ जगिदशसिंग आचोलसिंग दुधानी (वय ३२) (दोघेही रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी, ता. बीड) ३) अक्षय पोपटराव पाडुळे (वय २९) रा. विमाननगर लेन नं. १३, सी रुम नं. ९१३, लोहगांव, ता. हवेली, जि. पुणे, ४) हमीद मोहंमद शेख (वय २३) रा. रामटेकडी, हडपसर, ता. हवेली, पुणे अशी त्यांची नावे आहेत. 


यातील टोळीतील आरोपींनी बार्शी, अंबोजोगाई, कळंब, पुणे याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर राज्यभरात एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत. पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींकडून बार्शी पोलिसांनी बार्शीच्या गुन्ह्यातील ९२०० रुपये, चंदननगर, पुणे येथून चोरलेली दोन लाखाची कार व अंबोजोगाई शहर पोलिस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीतील रोख रकमेपैकी ४ लाख ४५ हजार रुपये रोख असा ६ लाख ५४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


सदर कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पो. अधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. अण्णासाहेब मांजरे, सपोनि दिलीप ढेरे, उपनिरक्षक महेश गळगटे, गुन्हे प्रकटीकरणचे शैलेश चौगुले, रियाज शेख, मनिष पवार, अंकुश जाधव, सचिन देशमुख, सचिन नितनात, अविनाश पवार, राहुल उदार, धनराज फत्तेपुरे, रोहित बागल, प्रल्हाद आकुलवार, मोहन कदम, शरद वाघमोडे, सचिन अंकुश, इसामियाँ बहीरे व सायबरचे रतन जाधव यांनी केली.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)