Ramachandra Ikare honored with the Abhivyakti Sahitya Puraskar
बार्शी विशेष : अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था, नागपूर या साहित्य संस्थेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त साहित्य पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये रामचंद्र इकारे यांना 'अक्षरांची रांग ' या लेखसंग्रहासाठी सर्वोत्कृष्ट ललीत लेखसंग्रह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी, प्रमुख अतिथी ज्येष्ठ लेखिका विजया ब्राह्मणकर, अमरावतीच्या सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे, अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर आदींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. स्मृतिचिन्ह, शाल व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, ॲड. कुमकुम सिरपूरकर, ज्येष्ठ लेखिका आशा बगे, आशा पांडे, डॉ. अंजली पारनंदीवार, डॉ. मालविका देखणे, वसंत वाहोकार यांच्यासह पुरस्कार विजेत्या जयश्री अंबासकर, रश्मी वाघमारे आदी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास स्वाती सुरंगळीकर, डॉ. शुभा साठे, अश्विनी पुराणिक, वर्षा थोटे, डॉ. लीना निकम, प्रा. मीनल येवले, रश्मी पदवाड-मदनकर यांच्यासह अभिव्यक्तीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिव्यक्तीच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर, सूत्रसंचालन सुषमा मुलमुले यांनी तर आभार प्रदर्शन अंजली पांडे यांनी केले.
'अक्षरांची रांग' या लेखसंग्रहास यापूर्वी साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन व ऍग्रोन्यूज परिवार फलटण यांचाही साहित्य पुरस्कार मिळाला आहे. रामचंद्र इकारे यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.