An old man who was hit by a bike died during treatment
बार्शी विशेष : दुचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सुरेश रामराव साठे (वय ६५) रा. शिवाजी नगर, वैराग असे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
१३ जानेवारी रोजी दुपारी ४ चे सुमारास वैराग येथून सासुरे फाटा येथील साई आयुर्वेदीक कॉलेज येथे वॉचमन ड्युटीसाठी ते सायकवरुन जात असताना, धाराशिव फाट्याच्या अलिकडील वळणावर पाठीमागून आलेल्या स्कूटी (क्र. एमएच-१३-डीडी-६८४८) वाहनाने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
पुढील उपचारासाठी त्यांना वैराग मधील मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु १५ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उमेश सुरेश साठे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, स्कूटी चालक अमोल दत्तात्रय भोसले रा. राळेरास, ता. बार्शी यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.