Will teach a Guaranteed lesson in the upcoming Lok Sabha elections; the Determination of Maratha society
बार्शी विशेष : धाराशिव लोकसभा मतदार संघातून येत्या निवडणूकीसाठी मराठा समाज एक हजारापेक्षा अधिक उमेदवार उभा करणार असून, त्यापैकी दोनशेहून अधिक उमेदवार बार्शी तालुक्यातून उभे करण्याचा निर्धार मराठा समाजाने व्यक्त केला.
बार्शीतील शासकीय विश्रामगृहात झालेल्या समाजाच्या बैठकीत, याबाबत एकमताने निर्णय होऊन विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहून, मराठ्यांना आरक्षण न दिलेल्या सरकारला येत्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपचे सर्व उमेदवार पाडून 'गॅरंटीने' धडा शिकवायचा असा दृढ निश्चय या बैठकीत करण्यात आला.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील गावांगावांतून लोकवर्गणीचे संकलन सुरु केलेल्या समाजबांधवांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावांतून दोन, बार्शीतून पंचेवीस तर वैरागमधून वीस उमेदवार या निवडणूकीत उभे केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सदर बैठकीस आनंद काशीद यांच्यासह धनंजय तर, विनायक घोडके, पोपट डमरे, भारत देशमुख, अजित जगदाळे, विक्रम घायतिडक, अतुल गाढवे, अविनाश लोंढे, राजाभाऊ कापसे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.