Voting Awareness Campaign in Barshi Industrial Estate
बार्शी विशेष : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, बार्शी तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेच्यावतीने शुक्रवार १ मार्च रोजी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मतदान जनजागृती अभियान शिबीर घेण्यात आले.
कामगारांसाठी मतदार नोंदणी, मतदार जनजागृती आणि मतदानाचा टक्का वाढाविण्याच्या हेतूने बार्शीच्या औद्योगिक वसाहतीमधील मारुती रोप्स इंडस्ट्रीजमध्ये सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
मतदानाच्या हक्काविषयी जाणीव करुन देत सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी यावेळी बोलताना केले. या शिबीरास मंडळ अधिकारी खाडवी, कारखान्याचे व्यवस्थापक सिंग, पाटील, ढोले यांच्यासह सुमारे साडेचारशे कामगार उपस्थित होते.