कर्जबाजारीपणाला कंटाळून फायनान्स कंपनीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Admin
0

 

Attempted self-immolation in front of finance company due to debt

Attempted self-immolation in front of finance company due to debt

बार्शी विशेष : कर्जबाजारीपणाला कंटाळून फायनान्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर अंगावर केरोसीन ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार बार्शीत घडला. बाबासाहेब नागनाथ गायकवाड (वय ४२) रा. सुभाषनगर, गोविंद दाळ मिलजवळ, बार्शी असे या व्यक्तीचे नाव आहे.


सोलापूर रस्त्यावरील विस्तार फायनान्स कंपनीच्या कार्यालयासमोर कॅनमधील केरोसीन अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न करत असताना गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सदर फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नसल्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. ही घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे शरद वाघमोडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)