Voice of Media honored senior journalists in Barshi
बार्शी विशेष : समाजाची आवड आणि माध्यमांचे स्वरुपही बदलत आहे, त्यानुसार आपण नव्या बदलत्या प्रवाहाचा स्विकार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार एन.आर.कुलकर्णी यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया आयोजित ज्येष्ठ पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे बोलताना कुलकर्णी यांनी, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांतील प्रगतीमुळे समाजात मांडले जाणारे चित्र आशादायी आहे. ते चित्र जगाशी जोडणारे, वेगाने प्रगतीकडे नेणारे असल्याने त्याचे स्वागत करुन आत नव्याचा स्विकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. समाजाच्या प्रगतीसाठी झगडणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या बदलांसह सज्ज रहाण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी आजपर्यंतच्या पत्रकारितेचा प्रवासही वर्णन केला.
शनिवार दि. ६ जानेवारी रोजी सावळे आण्णा सभागृहात व्हॉईस ऑफ मीडियाच्या शहर व तालुका शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना अजित कुंकूलोळ यांनी व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेचे देश आणि परदेशात पत्रकारांसाठी सुरु असलेले कार्य सांगून भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवर व पुरस्कारप्राप्त ज्येष्ठांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योजक अनिल बंडेवार यांनी भूषविले, तर व्यासपीठावर ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. बापूसाहेब उर्फ परशुराम करंजकर, न्यूरोसर्जन डॉ.अमित पडवळ, संशोधक शेतकरी नवनाथ उर्फ नाना कसपटे, शि. शि. प्र. मंडळाचे खजिनदार जयकुमार उर्फ बापू शितोळे, उद्योजक मधुसूदन चांडक, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे नवनिर्वाचीत पदाधिकारी हर्षद लोहार (शहराध्यक्ष), विजय शिंगाडे (उपाध्यक्ष), जमीर कुरेशी (सचिव), मयूर थोरात (कार्याध्यक्ष) आदींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
प्रास्तविक हर्षद लोहार यांनी व सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले. तर तालुकाध्यक्ष संदीप मठपती यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी पदाधिकारी राहुल गुरव, आस्लम काझी, राहुल भालशंकर, मुजम्मिल कौठाळकर, सदस्य शाम थोरात, समाधान चव्हाण, प्रदिप माळी, मल्लिकार्जुन धारुरकर, निलेश झिंगाडे, प्रविण पावले, सागर गरड, शुभम गोवर्धन, शोएब बागवान, नितीन गाढवे, किशोर सोनवणे, ओंकार गायकवाड, असिफ मुलाणी आदींनी परिश्रम घेतले.
- कोठारी लॅबोरेटरीच्यावतीने संघटनेच्या सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेने धन्वंतरी पूजन करुन, डॉ. आदित्य कोठारी यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

