Two vehicles were damaged in a collision with a speeding car
बार्शी विशेष : भरधाव वेगातील कारने दोन वाहनांना धडक दिल्यामुळे १ लाख १० हजाराचे नुकसान झाल्याची घटना घडली. याबाबत प्रा. रामेश्वर रावसाहेब कोठावळे (वय ५६) रा. जैन मंदिर जवळ, बार्शी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
शहरातील हॉटेल अभिजीत समोर इको स्पोर्टस कार (क्र.एमएच-१३-डीएम-४१९०) सह मी थांबलो होतो, त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारुती सुझुकी कारने (क्र. एमएच-१२-एफके-२९८४) माझ्या कारला चालकाच्या बाजूने धडक दिली आणि कार चालक शिव्या देत वेगात निघून गेला. धडकेमुळे माझ्या कारचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले.
तसेच पुढे लोकमान्य चाळीजवळ सदर कार चालकाने हिमांशु चावडा यांच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र.एमएच-४५-आर-२७७६) ला धडक देऊन अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान केले, असे कोठावळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. १५ जानेवारी रोजी रात्री सातचे सुमारास ही घटना घडली असून, सदर धडकेत कुणीही जखमी झाले नाही. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.
