माजी सैनिकाच्या मोटरसायकलची चोरी

Admin
0

 

Ex-serviceman's motorcycle stolen

Ex-serviceman's motorcycle stolen

बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातून मोटरसायकल चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील सेवानिवृत्त माजी सैनिक भारत उत्रेश्वर सावंत (वय ६७) यांची, राहत्या घरासमोरील मोकळ्या पत्राशेडमध्ये लावलेली होंडा ड्रीम मोटरसायकल (क्र.एमएच-१३-बीडब्ल्यू-४६६५) अज्ञात चोरट्याने पळवून नेली. ही घटना ११ जानेवारीच्या रात्री साडेनऊ ते१२ जानेवारीच्या सकाळी सातचे दरम्यान घडली. भारत सावंत यांनी यासंदर्भात पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील खांडवी येथील जि. प. मुलांच्या शाळेच्या गेट समोर हँडल लॉक करुन लावलेली होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र.एमएच-१३-बीसी-७३१३) अज्ञात चोरट्याने पळवली. १३ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ ते रात्री अकराचे दरम्यान ही घटना घडली. याबाबत राम कुंडलिक माळी (वय २८) रा. खांडवी, ता. बार्शी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)