The thief stole the lawyer's bullet
बार्शी विशेष : वकिलाने घरासमोरील गेटच्या आत लावलेली बुलेट मोटरसायकल चोरट्याने पळवली. बार्शीच्या कासारवाडी रस्त्यावरील ऑक्सीजन पार्कजवळ ही घटना घडली. याबाबत वैभव सज्जनराव देशमुख (वय २८) रा. कलाखंड निवास, गंगानगर, कासारवाडी रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
बार्शी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे वैभव देशमुख यांनी, त्यांचे जेष्ठ वकिल प्रविण करंजकर यांची बुलेट (क्र. एम. एक्स. क्यू. ३३१३) थोड्या दिवसाकरीता वापरण्यासाठी २६ डिसेंबर रोजी आणली होती.
३१ डिसेंबरच्या रात्री अकरा वाजता जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बुलेट घराच्या गेटच्या आतमध्ये लावली. दुसऱ्या दिवशी १ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सकाळी साडेआठच्या सुमारास घराबाहेर आल्यानंतर गेटच्या आत लावलेली बुलेट दिसून आली नाही. मित्रांच्या सहाय्याने आसपास व परिसरात शोध घेऊनही सापडली नाही. त्यामुळे बुलेट चोरीला गेल्याची खात्री झाल्याने देशमुख यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोना पायघन करत आहेत.
