जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Admin
0

 

Case registered for blocking road in violation of prohibitory orders

Case registered for blocking road in violation of prohibitory orders

बार्शी विशेष : सोलापूर जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी, बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सपोफौ सोमनाथ जगताप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

मौजे कासेगाव, पंढरपूर येथील महादेव वाघमारे यांच्या मृत्युची चौकशी करुन तातडीने कारवाई व्हावी, या मागणीसाठी नवनाथ चांदणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शीतील मातंग समाजाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शहर पोलिसांना देण्यात आले होते.

त्यावर मा. अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेशान्वये सोलापूर जिल्ह्यात ३७ (१) (३) प्रमाणे जमावबंदी आदेश लागू असल्याने रास्ता रोको करु नये अशी समज नवनाथ चांदणे यांना पोलिसांनी दिली होती.

तरीही नवनाथ निवृत्ती चांदणे, अमोल अनिल चव्हाण, लखन राम शेंडगे, आनंद चांदणे, रविंद्र बजरंग थोरात, सुनिल दत्तू अवघडे, संदीप नरहरी अलाट, प्रशांत काळे, आशिष शिंदे, नाथा शाहू मोहिते, कृष्णा विठ्ठल रणदिवे, रोहित विजय अवघडे, संतोष बळीराम कांबळे (सर्व रा. लहुजी वस्ताद चौक, बार्शी), गोविंद संजय शेंडगे रा. भीमनगर, बार्शी व इतर अनोळखी ३५ ते ४० लोकांनी ३ जानेवारी रोजी दुपारी पावणे एक ते दीडच्या दरम्यान  बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करुन, रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांची, लोकांची अडवणूक करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांनी त्यांचेविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम १४३, ३४१, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)