अबब! 'निवांत' बार्शी शहरातून 'एवढ्या' तक्रारी पोलिसात दाखल

Admin
0

 

'So many' complaints filed with police in 'quiet' Barshi city

'So many' complaints filed with police in 'quiet' Barshi city

बार्शी विशेष : काय मग? कसे आहात? असा प्रश्न विचारल्यानंतर काही नाही 'निवांत' आहे असे हमखास उत्तर देणारे बार्शीकर खरोखरीच निवांत आहेत का असा प्रश्न ही बातमी वाचल्यानंतर पडल्याशिवाय राहणार नाही.

याला कारण तसेच आहे, नुकत्याच संपलेल्या २०२३ या वर्षात शहर पोलिस ठाण्यात १२०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये घडलेल्या गुन्ह्यांसोबतच पोलिसांनी दाखल केलेल्या अवैध दारु, मटका, जुगार, वाहतूक, वाहन कायदा आदी तक्रारींचाही समावेश आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत दाखल झालेल्या १२०० तक्रारींची सरासरी बघता महिन्याकाठी सुमारे १०० म्हणजेच दिवसाकाठी साधारणतः ३ ते ४ तक्रारी दाखल झाल्या असे अनुमान निघते. 

याव्यतिरिक्त तालुक्यातील बार्शी तालुका पोलिस ठाण्यात ४६४, पांगरी पोलिस ठाण्यात २७४ तर वैराग पोलिस ठाण्यात ७१५ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

एकट्या बार्शी शहरातील १२०० तक्रारींचा आकडा बघता बार्शीकर खरोखरीच 'निवांत' आहेत का? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. नविन वर्षात परस्पर सामंज्यस्यातून 'शांत बार्शी, निवांत बार्शी' ही ओळख कायम ठेवण्याचा संकल्प करुन, पोलिस प्रशासनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न बार्शीकर नक्कीच करतील अशी आशा करुयात.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)