दोन गटात झालेल्या मारामारी संदर्भात परस्परविरोधी तक्रारी दाखल

Admin
0

 

Conflicting complaints were filed regarding the fights between the two groups

Conflicting complaints were filed regarding the fights between the two groups

बार्शी विशेष : वाढदिवस साजरा करताना केक खावू घालण्याच्या कारणावरुन झालेल्या मारामारी संदर्भात दोन गटांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री बार्शीच्या पंकजनगर येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली होती. 

लखन हाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त कापलेला केक लखन यास खावू घालत असताना, तुझी केक खावू घालायची लायकी आहे का असे म्हणत लखन हाटकर, तुषार जंगम, विकी पारसे व राज रणखांबे यांनी शिवीगाळी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली, तसेच सोबत असलेला भाचा करण जाधव याच्या पाठीवर चाकूने मारुन जखमी केले, अशी तक्रार श्रीरंग सुरेश वीर (वय २४) रा. वाणी प्लॉट, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. 

तर लखन हाटकर यांच्या घरासमोर वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी एकत्र आलेलो असताना मद्यप्राशन केलेला श्रीरंग वीर व त्याच्यासोबत असलेले करण जाधव, अण्णा पाचेगावकर व सौदा जाधव यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विनाकारण गोंधळ करु नका असे म्हणाल्यामुळे चिडून मला व लखन हाटकर यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास दोन मोटरसायकवरुन ते चौघे पुन्हा माझ्याकडे आले व श्रीरंग वीर आणि करण जाधव यांनी आमचे विरोधात तक्रार देतो का म्हणत लाकडी दांडक्याने तसेच अण्णा पाचेगावकर व सौदा जाधव यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळी करत निघून गेले, अशी तक्रार राज गणेश रणखांबे (वय २२) रा. पंकजनगर बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सपोफौ वरपे करत आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)