Two-wheeler thefts were reported from Barshi town as well as in the taluka
बार्शी विशेष : बार्शी शहरासोबतच तालुक्यातूनही दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. घरासमोर हँडल लॉक करुन लावलेली बुलेट मोटरसायकल (क्र. एमएच-१३-सीडब्ल्यू-५८२०) २६ डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते २७ डिसेंबरच्या सकाळी सातचे दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार अमोल अशोक काजळे (वय ३९) रा. अरणगाव, ता. बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.
तर राहत्या घरासमोर लावलेली हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीके-२८८४) २२ डिसेंबरच्या रात्री दहा ते २३ डिसेंबरच्या पहाटे ४ चे दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेली अशी तक्रार बालाजी बापूराव गिराम (वय ३७) रा. गोरमाळे, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
