दुपारी घरात किरकोळ वाद; रात्री मुलगी बेपत्ता

Admin
0

 

College girl missing due to minor dispute

College girl missing due to minor dispute

बार्शी विशेष : घरात दुपारी किरकोळ वाद झाला आणि महाविद्यालयात शिकणारी मुलगी रात्रीतून बेपत्ता झाल्याची घटना बार्शीत घडली. तिला कुणीतरी पळवून नेल्याची फिर्याद तिच्या पालकांनी पोलिसात दिली आहे. 

फिर्यादीना मुलबाळ नसल्यामुळे नातेवाईकाच्या मुलीचा सांभाळ ते मुलीप्रमाणे करत असून सदर मुलगी बार्शीतील एका महाविद्यालयात १२ वीत शिक्षण घेत आहे. २६ जानेवारी रोजी दुपारी चारचे सुमारास मुलगी अभ्यास करत असताना, घरातील काम करण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या पत्नीचा मुलीशी वाद झाला त्यावेळी फक्त अभ्यास करु नको, घरातील काम पण करत जा असे मुलीला समजावले होते.

रात्री साडेनऊला जेवण केल्यानंतर सगळे झोपण्याच्या तयारीत असताना मुलगी घराबाहेर बाथरुमला जाण्यासाठी गेली. बराच वेळ झाला तरीही ती घरात न आल्यामुळे पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला तसेच नातेवाईकाकडे चौकशी करुनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. 

त्यामुळे कुणीतरी अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करुन पालकांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. बार्शी शहर पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदविला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)