मोटरसायकलच्या धडकेमुळे महिलेचा मृत्यु

Admin
0

 

Woman dies due to motorcycle collision

Woman dies due to motorcycle collision

बार्शी विशेष : भरधाव वेगातील मोटरसायकलने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील लक्ष्याची वाडी येथे घडली. दमयंती प्रभाकर चौरे (५५) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पुतणे हनुमंत रामलिंग चौरे (वय ४२), रा. लक्ष्याची वाडी, ता. बार्शी यांनी सदर घटनेची फिर्याद बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

हनुमंत चौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ नोव्हेंबर रोजी मी लक्ष्याची वाडी येथील माझ्या किराणा दुकानाबाहेर सायंकाळी ६ चे सुमारास उभा होतो. त्यावेळी माझी चुलती दमयंती प्रभाकर चौरे (वय ५५) रा. लक्ष्याची वाडी, ता. बार्शी या पीठ गिरणीमध्ये दळण ठेवून रस्त्याच्या कडेने घराकडे चालल्या असताना, परांड्याकडून भरधाव  वेगाने आलेल्या एका मोटरसायकलची त्यांना पाठीमागून धडक बसली. धडकेमुळे त्या रस्त्यावर पडल्याचे बघताच, मी तेथे धाव घेतली तेव्हा त्या बेशुध्द पडलेल्या होत्या, आणि त्यांच्या कानातून, डोक्यातून रक्त येत होते. गावातील लोकांच्या मदतीने तातडीने त्यांना पिकअपमधून बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्या मयत झाल्याचे सांगितले. 

मोटरसायकल चालक रणजीत दत्तू समिंदर रा. हिंगणागाव, ता. परांडा याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल (क्र. एमएच-१३-डीडब्ल्यू-९५४१) हयगयीने व भरधाव वेगाने चालविल्यामुळे धडक होऊन चुलतीच्या मृत्युस कारणीभूत झाला, अशी फिर्याद हनुमंत चौरे यांनी बार्शी तालुका पोलिसात दिली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)