दवाखान्यासमोरील पार्किंगमधून दुचाकीची चोरी

Admin
0
Theft of a bicycle from the parking lot in front of the hospital

Theft of a bicycle from the parking lot in front of the hospital

बार्शी विशेष : दवाखान्यासमोरील पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार युवराज रावसाहेब करळे (वय ४३) रा. अलीपूर रोड, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ च्या दरम्यान घडली.

करळे यांनी त्यांची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एम-एच-१३-डीए-६४२८) कुर्डुवाडी रस्त्यावरील पोकळे हॉस्पीटलमधील मेडिकल स्टोअर्समध्ये सकाळी ८ वाजता कामासाठी आल्यावर हॉस्पीटल समोरील पार्किंगमध्ये लावली होती. जेवण करुन दुपारी ३ वाजता बाहेर आल्यानंतर दुचाकी पार्किंगमध्ये दिसली होती, परंतु सायंकाळी ५ वाजता सुट्टी झाल्यानंतर दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)