बार्शीतून दुचाकी चोरीला जाण्याच्या दोन घटना

Admin
0

 

Two cases of bike theft from Barshi

Two cases of bike theft from Barshi

बार्शी विशेष : बार्शी शहरातून दुचाकी चोरीला गेल्याच्या दोन तक्रारी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. घरासमोर हँडल लॉक करुन लावलेली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच-१३-डीडब्ल्यू-२६८७) दि. ७ डिसेंबर रात्री साडेनऊ ते ८ डिसेंबर सकाळी साडेसहाच्या दरम्यान चोरीला गेली अशी तक्रार प्रमोद युवराज रणदिवे (वय २७) रा. शेंडगे प्लॉट, उपळाई रोड, बार्शी यांनी दिली आहे. 

तर दि. १८ डिसेंबर रात्री साडेनऊ ते १९ डिसेंबर सकाळी साडेसातच्या दरम्यान घरासमोर हँडल लॉक करुन लावलेली स्प्लेंडर प्रो मोटरसायकल (क्र. एम-एच-१३-एवाय-९९४७) चोरीला गेल्याची तक्रार अनिल शिवा शिराळ (वय ३६) रा. ऐनापूर मारुती रोड, जुने सोमाणी हॉस्पीटल समोर, बार्शी यांनी दिली आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)