बार्शी बस स्थानकातून आणखीन दोन महिलांचे सोन्याचे गंठण पळवले

Admin
0

 

Two more women's gold ganthan snatched from the Barshi bus stand

Two more women's gold ganthan snatched from the Barshi bus stand


बार्शी विशेष : बार्शी बस स्थानकातून दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची माळ व मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार दाखल झालेली असतानाच, त्याच दिवशी आणखीन दोन महिला प्रवाश्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने खेचून पळवल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत सौ.मायादेवी प्रदीप पाटील (वय ५०) रा. गोलेगाव, पो. पारडी, ता. वाशी. जि. धाराशिव यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परांडा येथे रहात असलेल्या विवाहीत मुलीस भेटायला जाण्यासाठी पतीसह त्या बार्शी बस स्थानकावर आल्या होत्या. परांड्यास जाणाऱ्या बसला अचानक खूप गर्दी झाली. त्या गर्दीतून बसमध्ये जात असताना एका महिलेने त्यांना धक्का दिला. तोल सांभाळत असतानाच त्या महिलेसोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने गळ्यात हात घालून सोन्याचे गंठण जोरात खेचून घेतले. आरडाओरडा करेपर्यंत गंठण घेवून त्या दोन महिला गर्दीचा फायदा घेवून पसार झाल्या. ही घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचारचे सुमारास घडली.

सौ. मायादेवी पाटील यांनी ३० ग्रॅम वजनाचे (१ लाख २० हजार किंमतीचे) सोन्याचे गंठण चोरीस गेल्याची तक्रार दिली. तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्यानंतर सौ. सुनीता बबनराव आगळे रा. टी. पी. एस. रोड, धाराशिव यांचेही १८ ग्रॅम वजनाचे मिनी गंठण सुध्दा सदर वेळीच चोरीला गेल्याचे समजले असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)