७ लाख ७३ हजारांच्या दागिन्यांची चोरी; बार्शीच्या उपळाई रोड वरील घटना

Admin
0

 

Theft of jewelry worth 7.73 lakh; Incident at Uplai Road in Barshi

Theft of jewelry worth 7.73 lakh; Incident at Uplai Road in Barshi


बार्शी विशेष : हॉस्पीटलमध्ये दाखल असलेल्या आईला डबा देण्यासाठी गेल्यानंतर, किराणा माल आणण्यासाठी गेलेल्या पत्नीकडून घराचा दरवाजा उघडा राहिला आणि परत येईपर्यंत घरातून ७ लाख ७३ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले अशी फिर्याद बार्शीतील उपळाई रोड येथे राहणारे संजय आत्माराम पवार (वय ५९) यांनी पोलिसात दिली आहे.

देशमुख यांची आई मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर सोमाणी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिला डबा देण्यासाठी सकाळी ९ वाजता ते हॉस्पीटलमध्ये गेल्यानंतर सकाळी ११ चे सुमारास त्यांना पत्नीचा फोन आला की, तुम्ही डबा देण्यासाठी गेल्यानंतर मी किराणा माल आणायला दुकानात गेले. त्यावेळी माझ्याकडून घर उघडे राहिले होते. घरी आल्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले म्हणून मी बेडरुम मध्ये जाऊन पाहिले असता, बेडरुम मधील लोखंडी कपाट माझ्याकडून उघडे राहिले होते, आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत, तुम्ही लवकर घरी या.

---------------------------------------------------------------------------
🔴 हा ऐवज गेला चोरीला

सोन्याचे ४० ग्रॅमचे गंठण, ५० ग्रॅम पाटल्या (२), ३० ग्रॅमचे १ व १६ ग्रॅमचे १ लॉकेट, २४ ग्रॅमचे १ व १८ ग्रॅमचे १ मंगळसूत्र, झुबे (३) एकूण १० ग्रॅम वजनाचे , १ ग्रॅमची बाळी, १ ग्रॅमचे कुडके, ६ ग्रॅमची बंगाली अंगठी, २ ग्रॅमचे टॉप्स, डोरले, ठुशी, नथ एकूण वजन ४ ग्रॅम असे सोन्याचे दागिने आणि २ चांदीचे जोडवे व चेन.

---------------------------------------------------------------------------

त्यामुळे ताबडतोब घरी जाऊन त्यांनी पत्नीसह घरामध्ये दागिन्यांचा शोध घेतला, पण ते मिळून आले नाहीत. ही घटना २२ डिसेंबर दिवशी सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान घडली. घरात ठेवलेला ७ लाख ७३ हजार रुपये किंमतीचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार देशमुख यांनी २६ डिसेंबर रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली. आजारी आईची देखभाल करण्यामध्ये तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)