भर दुपारी घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने पळवले; बार्शीतील घटना

Admin
0

The lock of the house was broken in the afternoon and gold ornaments were stolen; An Incident in Barshi

The lock of the house was broken in the afternoon and gold ornaments were stolen; An Incident in Barshi

बार्शी विशेष : भर दुपारी १ सुमारास शिक्षकाच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून ४६ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने पळवल्याची घटना बार्शीतील जिजाऊनगर, उपळाई रस्त्यावर घडली.

शरद दिगंबर पवार (वय ३९) रा. जिजाऊनगर, उपळाई रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. माढा तालुक्यातील बावी येथे जि. प. प्राथमिक शिक्षक असलेले पवार नेहमीप्रमाणे सकाळी ९ चे सुमारास मुलीसह बावी येथील शाळेत गेले होते. त्यांची पत्नी अष्टविनायक यात्रेसाठी गेली असल्यामुळे, शेजारी राहणारे संतोष जगदाळे यांच्या घरी चावी देऊन त्यांचा मुलगाही ९.३० च्या सुमारास शाळेत गेला.

दुपारी साडेबाराच्या सुमारास पवार यांना एका नातेवाईकाने कामासाठी मोटरसायकल पाहिजे म्हणून फोन केल्यामुळे, त्यांनी जगदाळे यांच्या पत्नीला फोन करुन चावी देण्यास सांगितले. काही वेळातच तुमच्या घराचा कोयंडा तुटलेला असून घर उघडे असल्याचा जगदाळे यांच्या पत्नीचा फोन आला. आणि फोनवर बोलत असतानाच एक जाडजूड इसम हातात काहीतरी घेऊन पळाल्याचे त्यांनी अचानक ओरडून सांगितले.

पवार यांनी पोलिस हेल्पलाईवर कॉल करुन ही घटना सांगितली आणि लगेच बार्शीला आले. घरात जाऊन पाहिले असता दोन्ही बेडरुम मधील लोखंडी कपाटे उघडी दिसली, आणि त्यामधील २२ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण व चांदीचे पैंजण असे ४६ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. 

ही घटना १५ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली. या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)